Total Pageviews

Friday 28 February 2014

पाखरु..



जेवायला मी शिकलो ते "चिऊ" आणि "काऊ" सोबत...
दोन घास त्यांचे अन एक माझा ...
जसजसा मोठा झालो तसतसा त्या जेवणासाठी वणवण कळु लागली...
आणि बापाची कदर त्याच वेळी काळीज कापुन गेली...

असो...
चिमण्या तश्या खट्याळ असायच्या...
झुबक्याने यायच्या चिवचिव करुन मायेने खायच्या ...
ईवल्याश्या मिठीत मावणार्या...
निरागस आणि गोंडस मनाच्या....

कावळे मात्र धुर्त...
चारी बाजुला नजर ठेउन ....जसं प्रत्येक क्षणाला चोर मनात ठेउन...
सडलेल्या हाडावरच मांस चोचणारे....
दगाबाज ... आपमतलबी ... आणि संधीखोर...

आता आता मधे कधीतरी जाऩवतं....
चिऊ हरवली आहे कुठे दिसतच नाहि आजकाल...
कावळे खुप वाढलेत पण.... चिउ दिसत नाहि...

चिउ आणि काऊ .... दोगेहि माणसा सारखे झालेत...
पहिले दोघ असायचे .... पण आजकाल कावळे खुप झालेत....
दगाबाज ... आपमतलबी ... आणि संधीखोर...

मला पण उडुन जायचय ... चिऊ बरोबर...
मन नाहि होत जगायचं ह्या कावळ्यांबरोबर...

No comments:

Post a Comment