Total Pageviews

Friday 28 February 2014

पाखरु..



जेवायला मी शिकलो ते "चिऊ" आणि "काऊ" सोबत...
दोन घास त्यांचे अन एक माझा ...
जसजसा मोठा झालो तसतसा त्या जेवणासाठी वणवण कळु लागली...
आणि बापाची कदर त्याच वेळी काळीज कापुन गेली...

असो...
चिमण्या तश्या खट्याळ असायच्या...
झुबक्याने यायच्या चिवचिव करुन मायेने खायच्या ...
ईवल्याश्या मिठीत मावणार्या...
निरागस आणि गोंडस मनाच्या....

कावळे मात्र धुर्त...
चारी बाजुला नजर ठेउन ....जसं प्रत्येक क्षणाला चोर मनात ठेउन...
सडलेल्या हाडावरच मांस चोचणारे....
दगाबाज ... आपमतलबी ... आणि संधीखोर...

आता आता मधे कधीतरी जाऩवतं....
चिऊ हरवली आहे कुठे दिसतच नाहि आजकाल...
कावळे खुप वाढलेत पण.... चिउ दिसत नाहि...

चिउ आणि काऊ .... दोगेहि माणसा सारखे झालेत...
पहिले दोघ असायचे .... पण आजकाल कावळे खुप झालेत....
दगाबाज ... आपमतलबी ... आणि संधीखोर...

मला पण उडुन जायचय ... चिऊ बरोबर...
मन नाहि होत जगायचं ह्या कावळ्यांबरोबर...

Sunday 16 February 2014

सांज ...



दिसा मागुन दिस गेले...किती उन्हाळे अन् पावसाळे...
पारीजात कधी फुलला नाहि अंगणात...
मोगराहि दरवळला नाहि कधी नभी चांदण्यात...

क्षितिजावर एक अस्वस्थता आहे...
रंग रक्ताचा विस्कटून तेहि रवीला दुर सारत आहे...
वाराहि वेडापिसा होउन धावत आहे ...
विधवेचा आक्रोश जणु तो गिळुन बसला आहे...

विरक्त शांतता कानात उखळते तेल सांडते...
थवा सोडुन गेलेल्या एकल्या पक्ष्याला
त्याचेच मनं अस रोज मारते...

उनाड सड्यावर दुर दुर हा एकलेपणा दाटतो....
गवतावर दवा-चा अश्रु गाळुन ... कंठ त्याचा दाटतो...

कुठलासा एक तलाव गडद गंभीर झाला आहे...
आशेचा किरण त्याने प्रत्येक रात्री गमावला आहे...

काळोख होइल क्षण भरात ... मग शिकारी निघतील पुर्ण दमात...
कोणाचा बाप मारेल... कोणाची आई...
कोणाची लेकरे मारेल खेळ खेळुन कोणी....
त्यांच पण पोट असत ...
क्रुर खेळाने त्याच मन पण भरत असत...


माझं हे शब्द ऐकुन प्रत्येकजण रागवला...
एवढ्या सुंदर क्षणाचा अर्थ मी चुकीचा लावला...
प्रत्येकाच हेच मत होत... वास्तव काहि असो स्वप्न त्यांना पहायच होत...

पण सुदंर द्रुश्याच पण एक भयाण सत्य असत...
लोकांनी तोंड फिरवली तरी तेवढच त्यांना ते मान्य असत...
सुंदर भासणार्या गोष्टीत पण हे सत्य दडलेल असत...
हसर्या चेहर्यामागे पण कधीतरी त्याने त्याच मनं मारलेल असत....

कळत नसतील माझे बोल कोणाला...
आरसा पहावा त्याने ... त्या क्षणाला ...
मी नाहि ... तोच समजावेल तुमच्या मनाला....


Sunday 2 February 2014

आज तरी थोडावेळ जगु दे मला....



कधीतरी थंडीच्या सकाळी लवकर उठावस वाटत...
उभदार गोधडी घेवुन परत एकदा आईच्या मांडीवर डोक ठेवावस वाटत...
केसात हात फिरवत आई म्हणेल " शाळेत कोण जाणार?"
मी काहि न बोलता हलकसं हसुन डोळे मिटुनच राहिन...
थोडा वेळ तरी निवांत राहु दे मला...
आज तरी थोडावेळ जगु दे मला....

एक सांज असावी कोवळी...
तु असावी सोबत... समुद्राच्या अंगणात चालताना...
सुर्य दिवसभर थकुन जेव्हा खार्या पाण्यात कले कलेने बुडत असेल...
सोनेरी वाळुत पाहत आपण दोघे चालु... हात गुरफटुन एकमेकांच्या हातात...
तेवढयात वार्याची एक मंद झुळुक यावी... केसांशी खेळुन तुझ्या वर उडावी...
एक क्षण पाहु आपण एकमेकांच्या डोळ्यात....
बोलु दे आज त्यांनाच .... आपण बोलायच नाहि...
थोडा वेळ तरी हा संवाद करु दे मला...
आज तरी थोडावेळ जगु दे मला....