दिसा मागुन दिस गेले...किती उन्हाळे अन् पावसाळे...
पारीजात कधी फुलला नाहि अंगणात...
मोगराहि दरवळला नाहि कधी नभी चांदण्यात...
क्षितिजावर एक अस्वस्थता आहे...
रंग रक्ताचा विस्कटून तेहि रवीला दुर सारत आहे...
वाराहि वेडापिसा होउन धावत आहे ...
विधवेचा आक्रोश जणु तो गिळुन बसला आहे...
विरक्त शांतता कानात उखळते तेल सांडते...
थवा सोडुन गेलेल्या एकल्या पक्ष्याला
त्याचेच मनं अस रोज मारते...
उनाड सड्यावर दुर दुर हा एकलेपणा दाटतो....
गवतावर दवा-चा अश्रु गाळुन ... कंठ त्याचा दाटतो...
कुठलासा एक तलाव गडद गंभीर झाला आहे...
आशेचा किरण त्याने प्रत्येक रात्री गमावला आहे...
काळोख होइल क्षण भरात ... मग शिकारी निघतील पुर्ण दमात...
कोणाचा बाप मारेल... कोणाची आई...
कोणाची लेकरे मारेल खेळ खेळुन कोणी....
त्यांच पण पोट असत ...
क्रुर खेळाने त्याच मन पण भरत असत...
माझं हे शब्द ऐकुन प्रत्येकजण रागवला...
एवढ्या सुंदर क्षणाचा अर्थ मी चुकीचा लावला...
प्रत्येकाच हेच मत होत... वास्तव काहि असो स्वप्न त्यांना पहायच होत...
पण सुदंर द्रुश्याच पण एक भयाण सत्य असत...
लोकांनी तोंड फिरवली तरी तेवढच त्यांना ते मान्य असत...
सुंदर भासणार्या गोष्टीत पण हे सत्य दडलेल असत...
हसर्या चेहर्यामागे पण कधीतरी त्याने त्याच मनं मारलेल असत....
कळत नसतील माझे बोल कोणाला...
आरसा पहावा त्याने ... त्या क्षणाला ...
मी नाहि ... तोच समजावेल तुमच्या मनाला....
No comments:
Post a Comment