मन ना माझ कापरा च होत...
शुभ्र खोबर्या सारखं...
थोडस नाजुक... झटक्यात मोडनार...
देवासमोर जळावं ... आणि हवेत विरावं...
एवढसं स्वप्न मनात होतं...
खर सांगु ...
मन ना माझ कापरा च होत....
पण एक दुपारी डबी उघडी राहिली चुकुन...
वास्तवाच उन पडलं आणि मग क्षणात उडुन गेलं....
जसं आत कधी काहिच नव्हतं...
डबी आता रिकामी झाली आहे...
थोडा गंध तेवढा बाकी आहे...
तोहि उडुन जाईल... काळामध्ये...
मग ती सुध्दा येईल वापरामध्ये...
कस असतं ना ह्या जगात...
आतल्या वस्तुपेक्षा कधी कधी... डबीच जास्त असते उपयोगात...
No comments:
Post a Comment