दररोज रात्र झाली की मला मी भेटतो...
मग माझा हिशोब सुरु होतो...
बाकी नेहमी काहिच नसते...
बस मधुन मी आज तिला पाहिल...
कोवळ्या उन्हात ती तान्हुल्याला बसुन दुध पाजत होती...
रोज तिला बघतो मी... आणि रोज मला दिसतो मी...
कधी दुध पिताना कधी झोळीत उन खाताना...
हायवे च्या कडेला ... जिथे एका फुटाला २०००० मिळतात...
तिथेच ह्या बयेने करोडो रूपयाच्या पुलाला घराच छप्पर केल आहे...
लोक म्हणतात भिकारी म्हणुन... पण मायेची चुल तिने आत ठेवली आहे...
बाप दिसत नाहि पोराचा मला कधी... तिच्या डोळ्यातुन पण तो हरवला आहे ...
जुन्या काळचा मी दिसतो मला नेहमी ... पण आता तो मी हरवला आहे...
आई तशीच आहे .... पुला खाली आणि घराकडे... पण आता मी हरवला आहे
No comments:
Post a Comment