एक घर होत कुडाच...छप्पर कौलाच...
आणि राहणार्या माणसाच मन मातीच...
पावसात घर गळे... आणि शांततेत पाणि गोंगाट करे...
कुडाच्या भींतीं थोड्या ओल्या होत... थोडा ओलावा रुक्ष वाळवंटात मिळे...
उन्हाळ्यात कौलातुन उनासाठी थोडी जागा ठेवली होती...
दिवसभर खेळुन ते पण संध्याकाळी आई कडे जाई निजायला...
हिवाळे तसे रुक्ष असायचे...
रात्री सगळे झोपले कि घर पण रात्री एकटेच कुडकुडायचे...
घर आणि मी दोघं असे जगत होतो....
वर्षा मागुन वर्ष मोजत होतो...
पण कधी तक्रार नाही केली ... मी पण आणि त्याने पण...
एकमेकांशी बोलायचे कधीच केल नाहि मन...माझ पण आणि त्याच पण...
सकाळची घाई नसे आणि संध्याकाळच्या गप्पा पण...
घराची चुल पण थंड होउन वर्षे उलटली होती...
चुलीचा धुरच नव्हता तर डोळे कुठुन जळजळणार...
किती सुखाने मी घरात उदास राहतो...
No comments:
Post a Comment