Total Pageviews

Monday 6 June 2011

प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या...


ती एक अल्युमिनियमची परात घेउन बाहेर आली, परातीला तीच्या आयुष्याप्रमाणेच हजार पोंग होती... तीच्या आयुष्यात अश्या परस्थितीला सामोर जाण्याची वेळ हि काय पहिलीच नव्हती.
परातीला आतुन थोड पीठ मी पाहिल होत, आणि ते सुध्दा तीच्या प्रमाणेच जास्त भिजलेल होत...

आज पहिला पाउस होता... तो नेहमीप्रमाणे वेड्या अश्वावर आरुढ होता...
आकाशातुन सतत सरींचे तीर तीच्या झोपडीवर मारा करत होते , आणि सोसट्याचा वारा तीच्या पदराप्रमाणे झोपडीशी खेळत होता...
तीने परात खाली ठेउन क्षणभर वर पाहिल, आभाळाकडे
आणि मग आपल्या  झोपडीकडे,
   मोठ्या आशेने " आज कशीतरी रात्र सावरुन घे."

पण झोपडी तिच्यापेक्षा लाचार होती... तिला आणि तिच्या पोरांना एकच आधार होता, आणि तोही नजरे समोर प्राण सोडताना पाहुन अखेर तीच्या धैर्याचा बांध तुट्ला... आणि पावसाच्या गोड पाण्यात तीच्या डोळ्यातल खारट पाणि-- तिच्याशिवाय कोणालाहि दिसल नाहि... जसा दोन चार वर्षापुर्वी पोरांचा बाप असाच ह्या पावसामधे कोणालाहि दिसला नाहि...

पोरांच्या बापानंतर ह्याच झोपडीचा तीला आधार होता आणि तोहि ह्या पावसात जीव सोडत होता...

ती तश्याच पानावळ्या डोळ्यांनी आत शिरली... झोपडीची जमीन तिच्या डोळ्याएवढीच ओली होती.

आता तिच्या घरातली सर्व भांडीसुध्दा ह्या पाणि  अड्वा मोहिमेत खंभीरपणे तीच्या बरोबर लागली होती...
उन्हाळ्यात थेबांसाठी आसुसलेली आज दुधडीभरुन वाहत होती..

ती पोरांना मोठ्या धीराने म्हंणाली "आता थांबेल, मेला, मग जेवु." ... पोर "हो" म्हणाली
इतक्यात केरोसीनचा दिवा विझला... आणि तिने संधीचा फ़ायदा घेउन पदराने चेहरा फ़ुसला...
तीने मोठ्या शर्थीने कळोखात माचीस शोधली - भिजलेली... तीची खट्पट चालुच होती पण काडी काहि पेट्ली नाहि , शेवटी एक पेट्ली - तुट्लेली..

झोपडीत पुन्हा उजेड झाला होता ... आणि पाउस आता थोडा ओसरला होता.
तीने जेवणाचा टोप पुढे केला... चार भाकर्या आणि थोडा भात पोर चटनी बरोबर टोपातच खायला बसले...
ती बसली नाहि...
पोरांच पोट भरल.. ती उठ्ली आणि एक सुखी भाकरी खाउ लागली कोण जाणो अजुन भाकरी थोडी खारट्च लागत होती...
तितक्यात मोठा लेक आला आणि मांडीवर आड्वा झाला ... अजुनहि त्याच अंग गरमच होत.
पाउस आता गेला होता.. ती पोराला म्हणली... " आज शाळेत काय शिकिवल?"
पोर काहि बोलल नाहि.

तीने मग सर्व भांडी एकत्र केली... आपली एक सुकी साडी जमीनीवर अंथरली..
तीन पोरांना उराशी कवटाळुन ती झोपली...शांत....
वादळ आता शमले होते. मनातले तीच्या...
वादळांनंतरची निरव शांतता... त्यात कुठुन एक झुळुक गार वार्याची आली... समाधानाने ती झोपेतच हसली, आणि म्हणाली....  
                 नको सोन्याचा डोंगर, नको मोत्याचा सागर,
                      नको मखमली बिस्तर, नको रेशमी वस्तर
                     नको मला राज महाल, परी मागनेची एक देवा
                 सदा असावा प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या...
                 सदा असावा प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या... 

No comments:

Post a Comment