Total Pageviews

Friday 3 June 2011

नेहमीच ------- नाविन्य (?) !!!!


        खुप दिवसानंतर लिहावस वाटल, कारण हि तसच आहे म्हणा मला माझाच लेख आवडला नाहि. पण आज पुन्हा तोच वाचताना वाटल ’यार इतका काहि वाईट लिहला नव्ह्ता.’





अस्सो , ’आज पाऊस पडला’ 
"मग?, त्यात काय ते विशेष"


                                  पहिल्यांदा बघतो आहे काय? 





कोण जाणो पण आजहि तो मला नवीनच वाटला.... चेहर्या वर अलगद झेलताना तो आजहि ओला वाटला.... मंद वार्याची झुळुक आजहि तेवढिच का सुखावते .....




माझ हे बोलण तुला आजहि वेडगळ वाट्ल तर त्यात नवल नाहि ... कारण तु पावसात उभा नाहि...




आज कोण जाणो माझी सुध्दा जन्मोजन्मीची तहान माती बरोबरच शांत झाली आहे. माहित नाहि आणि जाणुन घेण्यात रसही नाही. 


मला एक लग्न उरकायचे आहे, मला  आवड्त नाहि लग्न समारंभ वगैरे, पण हे लग्न खास आहे....


मे चा महिना म्हणजे लग्न सराई चा काळ. सुन्दर, सोज्वळ, आणि ह्या  काळ्या दुनियेमधे सुध्दा आपला 
निरागसपणा जपलेली एक कुमारी... रंग तीचा मातीचा.... नाव तिच "धरीणी" ..... 




खुप काबाडकष्ट केले पण तिचा सोशिकपणा कमालीचा होता. माहेरच घर तिच्या कसोटीचे मंदिर होत.


 पण रणरणत्या उन्हात सुध्दातिने आपल्या संसाराची स्वप्ने हिरव्या रंगानी रंगवली होती.... पण तीच मन फार मोठ होत... त्यात एक खोली देवघराची होती...


               आज तिचा वरुणदेव तिच्यावर प्रसन्न झाला आहे. तिचा लग्नाचा मुहुर्त आला आहे ना... खास हिरवा मखमली शालु तिच्यासाठी येणार आहे.... संपला तो काळ घामठ्ळीचा.... आता तर वरुण राजा तिला थंड हवेच्या हवामहला मधे ठेवणार आहे... 


               पण काय करणार हो, माणुस मरताना पण तो जगण्याचं स्वप्न बघत असतो, तसच अगदि ह्या ’बये च’ झाल आहे. तिच्या डोळ्यामधे पुन्हा एकदा स्वप्नाची गर्भधारणा झाली आहे... ते स्वप्न आहे "आई" होण्याच... ती आता आपल्या गर्भातुन सोनेरी पिक उगवेल आणि आपल्या बाळांना पोसेल....


हा तीचा दर वर्षाचा विवाह सोहळा, मला आजहि नवीनच वाट्तो ... आजहि तिच्या पहिल्या मिलनानंतरचा सुगंध हवा वाटतो.... 




सर्व काहि जुनेच असुन सुध्दा प्रत्येक वेळी स्रुष्टी ह्या नाविन्यपुर्न बदल वेगळ्याच उत्साहाने साजरे करत असते. पण माणुस मात्र ह्या सर्व गोष्टी संकुचीत मनाने नेहमीच ह्या प्रसंगाना महत्व देत नाहि, आणि ह्या अलौकिक बदलाचा आनंद लुटत नाहि, याची मला फ़ार किव वाटते.


No comments:

Post a Comment