पुन्हा एकदा पाहिलं तुला! दिवस आणि वेळ किती बदललेले आहेत
तुझ्याकडे पाहावंसं वाटत पण ते चूक आहे ह्याची पण जाणीव होते
तू घराबाहेर काढले होते तेव्हापण परतून मी तुझ्याकडे असाच पाहिलं होते
एकदा परत तो क्षण आठवला, बाळा!!
तू आमचा तिरस्कार करतो ह्याचा अजिबात राग नाही मला
शपथ सांगते, तुझ्यावर अजूनहि तुटत नाही लळा
"सर्वात प्रिय काय आहे जगात तू कि माझा स्वाभिमान?" नेहमी विचारतात तुझे बाबा मला
मी शांत राहून मनातच पुटपुटते,
"माझ्या स्वाभिमानाने मला कधीच घराबाहेर हाकलून दिल आहे.
त्याला सुद्धा त्रास होत असेल म्हातारीचा... जसा तुला होत होता माझा"

No comments:
Post a Comment