मिचमिच डोळ्यांनी पुन्हा एकदा सकाळी उठलो...
आणि उरलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा एकदा झोपलो...
कोवळ्या रानात... आणि कोवळ्या उन्हात.... एखाद्या घाटात
ती अगदि धुक्यातल्या परीसारखी असते माझ्या मनात...
शेवटी नाइलाजाने उठुन बसलो...
आणि प्रत्यक्षात भेटेच्या विचारानी .... स्वताशीच हसलो...
धावत जाउन दुकानाबाहेर थांबलो... ती जरा लांबच होती...
चकचकनाय्रा काचे मधुन ती ती जरा जास्तच चकाकत होती...
गुलाबी रंग होता तीचा ... अगदि माझ्या स्वप्नासारखा होता...
उंच काळी सीट... चंदेरी ह्यांडल...मात्र डोळ्यातला भाव परका होता.
मग तीला हळुच बाहेर काढली...प्यांडलवर पाय टाकुन सीट वर बसलो...
थोड लडखडतच सावरल तीला... क्षणभरात मी पण सावरलो...
स्तिरावलो आणि मग राजासारखा हसलो...
मला हसताना लोकांनी बघुन नजरा फिरवल्या...
'पोरग येड झालय' म्हनुन बायका कुजबुजल्या...
पण आपल्याला कोणाची फीकीर नव्हती...कारण..
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...
मस्त फीरलो लांब लांब...
उन्हात उभे राहुन मनातल्या सावलीत होते सर्व थांब...
मग शाळेत गेलो... आणि सायकल मनात घेउनच घरी आलो..
जेउन अंथुरनात पडलो... आणि स्वप्नामधे सायकल शोधु लागलो..
हे माझ नेहमीच चं होत...सकाळ ते रात्र तोच नेम...
असं होत माझ पहिलं प्रेम....
ती तिच्या जागी सुखी होती... माझी तर तिला ओळखहि नव्हती...
पण मला त्याची फीकीर नव्हती... कारण
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...
एके दिवशी गेलो तेव्हां ती जागेवर नव्हती...
पाटलाच्या पोराने पळवली तिला... अशी कळली होती माहिती...
शिव्या शाप देत पाटलाच्या पोराला ...मी घरी निघालो....
आणि पाटलाच कारट्याला रस्त्यातच भेटलो...
गोरं गोरं कारटं सायकल वर काय शोभुन दिसत होत...
सायकलच पण मनं त्याच्यातच दिसत होत...
मी हिरमसुन खाली पाहिलं.... तेव्हा फाटक्या चपलीन मला सांगितलं
"वास्तवाचे चटके तिला झेपणार नाहि
... आणि तिच्या सावलीचा खर्च तुला झेपणार नाहि...
तिच्या किमतीची पाच अंकी संख्या तुझ्या पुस्तकात पण नाहि...
आणि तुझ्या बापाच्या खिशात पण नाहि...
लोक म्हणतात - प्रत्येकाच एक भाग्य असतं...
खर सांगु तर... त्यात आपल नशीब नेहमी नागडं असतं..."
चपलीचे बोल मला पटले....आणि तिच्या आनंदातच मला माझे हसु भेटले..
वास्तवात तर ती सायकल पाटलाच्या पोराचीच होती ना....
आणि सायकलीची जागा पण वाड्याच्या दाराशीच होती ना...
पण तरीही मला त्याची फीकीर नव्हती... कारण
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...