नमस्कार !!!!! माझे नाव मनोज, मुंबई मध्ये राह्तो. लेखन हा तसा माझ्या आवडीचा विषय मुळीच नाही, परन्तु वाचायला फ़ार आवडते. मी खुप अगोदर पासुन इनटरनेट वापरतो, आणि काहि blogs सुध्धा वाचतो. अगदि तेव्हा पासुन आपणहि काहि तरी लिहावे अस्स वाटत होतं.
खुप दिवसाच्या रिसर्च नंतर मराठीतुन blog लिह्ण्यचा विचार केला आहे. हा blog कोणासाठी, किंवा कशासाठी लिहतो आहे याची मला सुध्धा कल्पना नाहि. पण विचार मांडण्याची फ़ुकट लोकांना सल्ले देण्याची माझी खोड नक्की यातुन भागेल यात मात्र मला तिळमात्र शंका नाही.ह्या blog चा उद्देश हा फ़क्त माझे विचार मांड्णे आहे, आणि यामधुन केलेल्या सर्व टिका, मते हि कोणलाहि दुख:वण्याच्या उद्देशाने केलेल्या नसणार आहेत.
मराठि भाषेत बरेच साहित्य उपलब्ध आहे. आता मराठिचे साहित्य वाचनार्यांची संख्या सुध्धा वाढते आहे. परंतु कोण जाणे मराठि मध्ये इनटरनेट-वर तितकिशी प्रगति झालेली दिसत नाहि, कारणे बरीच आहेत.
पण, कोणतिहि भाषा टिकवण्यासाठि आणि वाढवण्यासाठि तिचा प्रचार आणि वापर वाढणे गरजेचे आहे.
ईनटरनेट सुध्धा आपल्याला असेच माध्यम उपलब्ध करुन देत आहे, आणि मी आता फ़क्त माझे विचार मांडण्यासाठि करणार आहे. मी ह्या कार्यात खारीचा वाटा उचलत आहे. यानंतर नियमितपणे पोस्ट लिहण्याचा विचार तर आहे. पाहु, आता कसं होतय ते!
नेहमी प्रमाणे पहिला मान देवाचा याप्रमाणे ही पोस्ट त्यानांच अर्पण करुन आता दुसर्या पोस्टच्या तयारीला लागतो. तुमचा सहभाग आणि प्रतिसाद असावा
No comments:
Post a Comment