Total Pageviews

Showing posts with label मुक्तांगण. Show all posts
Showing posts with label मुक्तांगण. Show all posts

Saturday, 28 June 2014

जुनं घर

थंडगार बगिच्यात बसुन...
वाड्याबाहेरचा पाउस बघत होतो...
परवाच फॉरेनहून मागवलेला कॉफी ...
आणि चॉकलेट कुकीज्...
स्वप्नातल वैभव पायाजवळ लोळत आहे
तरी मनाला अजुनहि कश्याची कमी सलत आहे.

तेवढ्यात..."ती" हातात पैश्याच एक बंडल घेउन आली...
फालतु रद्दी फेकावी तस तीने ते टेबलावर ठेउन म्हणाली..
"सड्यावरच्या झोपडीचे पैसे मिळाले...काय करु?"
मी हिरमुसुन पाहिलं ...खुपच पातळ वाटलं मला ते...

सड्यावर आमचं एक घर होत...
एवढसं माझ्या बापाच घबाड (संपत्ती) होतं..
कुडाच्या चार भिंती ... कौलाच छत... मातीची जमीन...
दोन चार बुडकुली (मातीची भांडी)... एवढं त्याच वैभव होतं...

जन्म माझा तिथला... बालपण त्याच मातीत मुरलं होत...
मोठं व्हायच, काहितरी करायचं स्वप्नपण मला तिथेच पडल होत...

उन्हाळी रात्री फार उकडायच... पण दिवसाचा ताप तेच सोसायचं...
हिवाळ्यात अंगाला अंग लाउन झोपायचो आम्ही...
आता चार खोल्यांचा वाडापण एकट्याला पुरतं नाहि...
पावसाळा आला की घर खुप रडायच...
आसवांच्या थेंबानी सारी जमीन भिजवायचं...

आयुष्याचे सारे खेळ तिथेच शिकलो...
पाहूणे नसतात माणसाला मी तिथेच समजलो...
कालची भाकरी पण गोड वाटायची...
मीठ टाकलेली मिरची भाजी वाटायची...

विकुन टाकल्या त्या भिंती आज...
मोडक्या भुतकाळाची आता वाटु लागली आहे लाज...

तरी त्या आठवणी ... ती स्पदंन ... ते श्वास अजुन तसेच आहेत...
चांगला गिर्हाईक भेटला तर ते पण विकुन टाकेन...
तेवढेच दोन पैसे जास्त मिळतील....

Friday, 25 April 2014

एका भिंतीच्या पलीकडे

कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी...
मित्रांच्या नादाने .... शाळेतुन पळालो होतो मी...

चपला टाकल्या होत्या पलीकडे अगोदर...
त्याच अंदाजावर स्वतःला पण भिरकावलं होत मी....
कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी..

निघताना काळीज गळ्याजवळ...
आणि काहितरी लागत होत कपाळाजवळ....
तरी खर सांगु...
बाहेर पडल्यापडल्या आभाळ आल होत चपलेजवळ...

दाउदपण आपल्याला बारका वाटला होता...
मुंबई चा किंग पण आपण खिश्यात ठेवला होता...
शर्टाच वरच बटण तेव्हा पासुन लावायच सोडल मी....
कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी..

हि गोष्ट नाहि जर कळली तुला....
तर तु खरच लहान आहेस बाळा...
कधी तरी तु पण उडी मारुन बघ...
बघ काय मजा येइल तुला....

शाळेच्या भिंती गेल्या कधीच्या काळात...
मग किती बांधल्या भिंती तु स्वतःच्या मनात...
हसताना पण असते एक भिंत....
पुन्हा रडु देत नाहि तुला एक भिंत...
दोघांमध्ये पण तु बांधली भिंत ....
एक तुझी भिंत ... आणि एक तिची भिंत...

दे कधी तु भिरकाउन अभिमानाच्या चपला ह्या भिंती वरून...
मग सोपी होईल उडी तुझी ह्या भिंतीवरुन...
घाबरु नको स्वतःला...
कारण भिंतीपलीकडेच तु भेटणार आहेस स्वताःला

भिंती मधे वेड्या अंधार आहे...
सुरक्षित असला तरी ..वेड्या तो पिंजरा आहे....
उजेड आहे ... आणि गारवा पण आहे...
ये लवकर मी अजुन भिंती-पलीकडेच उभा आहे....

Tuesday, 29 October 2013

हसु...!!!



दागिन्याच्या दुकानात गेलो होतो आज...
गेल्या बरोबर माझ्या खिश्याच वजन पाहिल डोळ्यांनी...
मग थोड थांबयला सांगुन तो वजनदार ताईंकडे वळला...
रांगेत वाट बघायची सवय मला जन्माच्या अगोदर पासुन आई बापानी लावली होती
त्यामुळे न सांगताच मी शेवटी जाउन उभा राहिलो...

गार गार वाटताच माझा खिसा साफ गारठुन गेला होता .... काय सांगु...
मग मी पण बावरुन इकडे-तिकडे पाहिल....

काचेच्या पलीकडे खुप स्वप्ने चकाकत होती...
त्यात मी माझ शोधत होतो...
भेटल ते... फक्त दुकानात पोहचे पर्यंत ते अजुन महागल होत....
पण मी पण निर्धार करुन आलो होतो घरुन...
आज तिच्या गोड आश्चर्याच्या हसण्यावर... मी सर्व विकणार...

मग मान वळवली .... दुखायला लागली होती एवढं वर बघुन...
सुंदर पर्या टेबलाच्या पलीकडुन प्रत्येक गिर्हाइकाला हसु वाटत होत्या...
त्यांच्या खिश्याच्या वजना इतकेच अगदि काळजीनी मोजुन...
सोनं विकतात शेवटि.... त्यांचा काटा पण एकदम काटेकोर होता...
कोणाला किती भाव द्यायचा बहुतेक ह्याचा पण कोर्स असेल त्यांचा...

मग मालकाकडे बघितल... तोंडावर हसु ठेउन बसला होता...
त्या हसन्याच बांधकाम मला एकदम भक्कम वाटत होत...
कपाळाच्या आठ्या कमी जास्त होत होत्या पण हसु तेवढच...
त्याच्या हसण्याची मला फार किव आली...
२३ कँरेट दागिन्याच्या मालकाला कोणितरी खोट हसु विंकुन गेल होत...

मोठ्या लोकांना माझी नजर दगा देउन मग टेबलाच्या अलीकडे वळली...
बाप पोरीच्या लग्नाचे दागिने घेत होता ...
पोरीचं हसु तो विकत घेत होता ..
पण कदाचित पैसे कमी घेउन आला होता...
कि पोर स्वप्न महाग बघत होती ....
माहित नाहि ... पण दोघ एकमेकांच हसु बघाण्यासाठी स्वता खोट हसत होते...

समोर आरसापण होता हे मला स्वताला बघितल्यावर उमगलं...
स्वच्छ आरश्यात मळकटलेला माझा अवतार बघुन थोड स्वतावर हसु आलं...
मात्र डोळ्यात मला तीचं हसु दिसत होत..

तितक्यात एका बयेने.... " सर प्लीज कम...." म्हणुन बोलावलं....
मी क्षणभर मागे बघुन तो "सर" मीच ...हे नक्की करुन पुढे सरसावलो....
मग लहान पोर जसं दुकानात बरणी दाखवतात ना तसं बोट दाखवलं...
तीने ते समोर काढुन दाखवलं... डोळे खुदकन हसले होते माझे तेव्हा...

मखमली पेटीत तीच हसु बंद करून .... तीलाच द्यायला घरचा रस्ता धरला..
पेटी उघडली तेव्हा कळलं अरे... माझ हसु तर त्याने फुकट दिलं होत...
ते नेहमी तिच्या हसण्या वऱ मला फुकटात मिळतं ना...
एवढा काय वाईट सौदा केला नव्हता मी...
खोट्या हसण्याच्या बाजारातुन दोन मायेचे दागिने आणले मी...
एक तीच हसु आणि एक माझ हसु....

Tuesday, 17 September 2013

मनात ती फक्त माझी होती !!!!




मिचमिच डोळ्यांनी पुन्हा एकदा सकाळी उठलो...
आणि उरलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा एकदा झोपलो...

कोवळ्या रानात... आणि कोवळ्या उन्हात.... एखाद्या घाटात
ती अगदि धुक्यातल्या परीसारखी असते माझ्या मनात...

शेवटी नाइलाजाने उठुन बसलो...
आणि प्रत्यक्षात भेटेच्या विचारानी .... स्वताशीच हसलो...

धावत जाउन दुकानाबाहेर थांबलो... ती जरा लांबच होती...
चकचकनाय्रा काचे मधुन ती ती जरा जास्तच चकाकत होती...

गुलाबी रंग होता तीचा ... अगदि माझ्या स्वप्नासारखा होता...
उंच काळी सीट... चंदेरी ह्यांडल...मात्र डोळ्यातला भाव परका होता.

मग तीला हळुच बाहेर काढली...प्यांडलवर पाय टाकुन सीट वर बसलो...
थोड लडखडतच सावरल तीला... क्षणभरात मी पण सावरलो...
स्तिरावलो आणि मग राजासारखा हसलो...

मला हसताना लोकांनी बघुन नजरा फिरवल्या...
'पोरग येड झालय' म्हनुन बायका कुजबुजल्या...

पण आपल्याला कोणाची फीकीर नव्हती...कारण..
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...

मस्त फीरलो लांब लांब...
उन्हात उभे राहुन मनातल्या सावलीत होते सर्व थांब...

मग शाळेत गेलो... आणि सायकल मनात घेउनच घरी आलो..
जेउन अंथुरनात पडलो... आणि स्वप्नामधे सायकल शोधु लागलो..

हे माझ नेहमीच चं होत...सकाळ ते रात्र तोच नेम...
असं होत माझ पहिलं प्रेम....

ती तिच्या जागी सुखी होती... माझी तर तिला ओळखहि नव्हती...

पण मला त्याची फीकीर नव्हती... कारण
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...


एके दिवशी गेलो तेव्हां ती जागेवर नव्हती...
पाटलाच्या पोराने पळवली तिला... अशी कळली होती माहिती...

शिव्या शाप देत पाटलाच्या पोराला ...मी घरी निघालो....
आणि पाटलाच कारट्याला रस्त्यातच भेटलो...
गोरं गोरं कारटं सायकल वर काय शोभुन दिसत होत...
सायकलच पण मनं त्याच्यातच दिसत होत...

मी हिरमसुन खाली पाहिलं.... तेव्हा फाटक्या चपलीन मला सांगितलं

"वास्तवाचे चटके तिला झेपणार नाहि
... आणि तिच्या सावलीचा खर्च तुला झेपणार नाहि...

तिच्या किमतीची पाच अंकी संख्या तुझ्या पुस्तकात पण नाहि...
आणि तुझ्या बापाच्या खिशात पण नाहि...

लोक म्हणतात - प्रत्येकाच एक भाग्य असतं...
खर सांगु तर... त्यात आपल नशीब नेहमी नागडं असतं..."

चपलीचे बोल मला पटले....आणि तिच्या आनंदातच मला माझे हसु भेटले..
वास्तवात तर ती सायकल पाटलाच्या पोराचीच होती ना....
आणि सायकलीची जागा पण वाड्याच्या दाराशीच होती ना...

पण तरीही मला त्याची फीकीर नव्हती... कारण
मनात तरी ती सायकल फक्त माझी होती...


Monday, 6 June 2011

प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या...


ती एक अल्युमिनियमची परात घेउन बाहेर आली, परातीला तीच्या आयुष्याप्रमाणेच हजार पोंग होती... तीच्या आयुष्यात अश्या परस्थितीला सामोर जाण्याची वेळ हि काय पहिलीच नव्हती.
परातीला आतुन थोड पीठ मी पाहिल होत, आणि ते सुध्दा तीच्या प्रमाणेच जास्त भिजलेल होत...

आज पहिला पाउस होता... तो नेहमीप्रमाणे वेड्या अश्वावर आरुढ होता...
आकाशातुन सतत सरींचे तीर तीच्या झोपडीवर मारा करत होते , आणि सोसट्याचा वारा तीच्या पदराप्रमाणे झोपडीशी खेळत होता...
तीने परात खाली ठेउन क्षणभर वर पाहिल, आभाळाकडे
आणि मग आपल्या  झोपडीकडे,
   मोठ्या आशेने " आज कशीतरी रात्र सावरुन घे."

पण झोपडी तिच्यापेक्षा लाचार होती... तिला आणि तिच्या पोरांना एकच आधार होता, आणि तोही नजरे समोर प्राण सोडताना पाहुन अखेर तीच्या धैर्याचा बांध तुट्ला... आणि पावसाच्या गोड पाण्यात तीच्या डोळ्यातल खारट पाणि-- तिच्याशिवाय कोणालाहि दिसल नाहि... जसा दोन चार वर्षापुर्वी पोरांचा बाप असाच ह्या पावसामधे कोणालाहि दिसला नाहि...

पोरांच्या बापानंतर ह्याच झोपडीचा तीला आधार होता आणि तोहि ह्या पावसात जीव सोडत होता...

ती तश्याच पानावळ्या डोळ्यांनी आत शिरली... झोपडीची जमीन तिच्या डोळ्याएवढीच ओली होती.

आता तिच्या घरातली सर्व भांडीसुध्दा ह्या पाणि  अड्वा मोहिमेत खंभीरपणे तीच्या बरोबर लागली होती...
उन्हाळ्यात थेबांसाठी आसुसलेली आज दुधडीभरुन वाहत होती..

ती पोरांना मोठ्या धीराने म्हंणाली "आता थांबेल, मेला, मग जेवु." ... पोर "हो" म्हणाली
इतक्यात केरोसीनचा दिवा विझला... आणि तिने संधीचा फ़ायदा घेउन पदराने चेहरा फ़ुसला...
तीने मोठ्या शर्थीने कळोखात माचीस शोधली - भिजलेली... तीची खट्पट चालुच होती पण काडी काहि पेट्ली नाहि , शेवटी एक पेट्ली - तुट्लेली..

झोपडीत पुन्हा उजेड झाला होता ... आणि पाउस आता थोडा ओसरला होता.
तीने जेवणाचा टोप पुढे केला... चार भाकर्या आणि थोडा भात पोर चटनी बरोबर टोपातच खायला बसले...
ती बसली नाहि...
पोरांच पोट भरल.. ती उठ्ली आणि एक सुखी भाकरी खाउ लागली कोण जाणो अजुन भाकरी थोडी खारट्च लागत होती...
तितक्यात मोठा लेक आला आणि मांडीवर आड्वा झाला ... अजुनहि त्याच अंग गरमच होत.
पाउस आता गेला होता.. ती पोराला म्हणली... " आज शाळेत काय शिकिवल?"
पोर काहि बोलल नाहि.

तीने मग सर्व भांडी एकत्र केली... आपली एक सुकी साडी जमीनीवर अंथरली..
तीन पोरांना उराशी कवटाळुन ती झोपली...शांत....
वादळ आता शमले होते. मनातले तीच्या...
वादळांनंतरची निरव शांतता... त्यात कुठुन एक झुळुक गार वार्याची आली... समाधानाने ती झोपेतच हसली, आणि म्हणाली....  
                 नको सोन्याचा डोंगर, नको मोत्याचा सागर,
                      नको मखमली बिस्तर, नको रेशमी वस्तर
                     नको मला राज महाल, परी मागनेची एक देवा
                 सदा असावा प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या...
                 सदा असावा प्रेमाचा पाउस झोपडीत माझ्या... 

Friday, 19 November 2010

वैकुंठवाटेचा सोबती !!

           "अरे वेड्या, कुठे चालला आहेस?" पुन्हा काहि नाहि. "अरे तुला तहान-भुक काहि आहे कि नाहि?" 
तेहि नाहि. अरे म्ह्टंल "ठरवलसं तरी काय?" पुन्हा तीच शांतता....
"बस्स!""पुरे झाले तुझे कौतुक, तु करावे, आणि मी निस्तरावे. तु आणि त्याने माझ्या जिवाशी काय खेळ मांड्लाय?"


             तु आजहि माझ्या सांगण्याप्रमाणे वागणार नाहिस काय? तु नेहमीच असा उनाड राहिलास आणि लोकांनी मला उनाड म्ह्ट्ले. तु मला कधी स्वस्थ बसुन दिले नाहिस आणि कधी काहि करुन सुध्धा दिले नाहिस.
             पण आता माझा अंत जवळ आला आहे माझा म्र्युत्यु मला आज साद घालत आहे. ह्या वेळी तर म्हणे शत्रु सुध्धा शत्रुत्व विसरतो. मग तु का ???






                        तु नेहमी असाच होतास कधी न माझा असताना नेहमी माझ्यातच होतास. हे माझ्या मना आतातरी घटकाभर माझ्यासोबत बस.  ह्या दुनियाभरच्या दगदगीत कधी वेळच मिळाला नाहि, तुझ्या आणि माझ्या ह्या दुरच्या प्रवासात आपण मात्र सोबतच्या खिडकितील प्रवाश्याप्रमाणे अनोळखीच राहिलो. पण आता माझे जग मावळते आहे. आता गोंधळातील शांतता मला एकु येत आहे तु पण ये आणि ऎक. आज आपण बोलुया आज मी हि बोलीन आणि तुझहि ऎकेन, खरतर मला कधी कळले नाहि तुला काय हवे आहे आणि तुला 
मला काय हवे आहे त्याची फिकीर नव्हती.  पण खरं सांगु

’तुझ्यावर रागवणे मला कधी जमलच नाहि कारण,
  तुझ्या शिवाय माझं मन कश्यात रमलच नाहि’

           याच कारणहि तसच आहे . तु माझ्या सोबतीला कधी नसतांना सुध्धा तु नेहमीच माझा साथीदार होतास कितीतरी वेळा जेव्हा पुर्ण जगानी माझ्याकडे पाठ फिरवली तेव्हां तु माझी समजुत घातलीस. माझं सर्व सत्य जाणनारा तुच आहेस. तुझ्या इतका जवळचा कोणिच नाहि ना आई, ना बाप ना मित्र ना सोबती. तु माझ्या सोबत जन्माला आलास आणि सोबतच जाणार हे चिरंसत्य मला आता गवसले आहे.
मी आता ह्या जगाचा निरोप घेत असताना तुझे सत्य आणि तुझे महत्व मला जगाला सांगायचे आहे. कदाचित यामुळे तरी लोक तुझा द्वेश सोडुन तुला समजुन घेण्याचा प्रयत्न करतील आणि स्वत:चा विकास तुझ्या इच्छांचा आदर करुन करतील.
पण भावनेच्या भरात ह्या मनाच्या नको ते लहान लहान हटट पुरवत राहु नका 
"प्रथम मंद वार्याची झुळुक, आणि त्यानंतरचा
 झंझावात कितीहि सुखावणारा असला 
तरीहि त्याचे वाद्ळात रुपांतर झाल्यावर 
मोठे-मोठे व्रुक्शहि उन्मळुन पडतात"
याच प्रमाणे आपल्या मनाच्या प्रथम लहान लहान हटट पुरवणे कितीहि सुखकारक असतील तरी या इछांचे वादळात रुपांतर झाले की मग मात्र त्याची परीणीती विध्वसांत होते.