Thursday 10 July 2014

असा होता एक पाऊस

दुपारच्या कड-कडत्या उन्हात...
कोण एक वेडा शेतात बसुन असतो...
नांगरुन ठेवलेल्या मातीची उगाच ठेकळी फोडत राहतो....
दररोज वाट बघुन तो उदास घरी परत येतो...
आणि उपाशी पोरांची तोंड बघुन...
शेतातुन हरवलेला पाऊस...डोळ्यात त्याच्या उतरतो....

रात्र झाली की हा पाऊस मला शहरांच्या रस्यावर दिसतो...
तलाव भरलेले रस्ते... त्यावर मेलेल्या झोपड्या...
कोपर्या वर बुडालेली कोणाची गाडी...गटाराची झालेली नदि...
आणि आडोसा शोधणारी पिल्लांसोबतची मादी(आई)...
मनात साचलेलं ते गटाराच पाणि...तो कचर्याचा चिखल..
किती आंघोळ केली तरी तसाच जाणवत राहतो...
गटारातला हा पाऊस सकाळी प्लास्टीकचा कचरा मागे विसरुन जातो...

परत सकाळी हा पाऊस कुठेतरी विसावतो...
धुक्यातल्या घाटात ...
पहिल्या प्रेमाच्या गारव्यात...
बंगल्याच्या खिडकीतुन कापसाच्या थेंबानी...
चेहर्यावर तिच्या बरसतो...
दिवसाच्या व्यापानंतर पाऊस पण दोन क्षण सुखाचे तिथेच शोधतो...

No comments:

Post a Comment